Date
January 1, 2023 - December 31, 2023
Time
11:00 - 20:00
In Awards

पुरस्काराचे स्वरूप :

१) ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३

प्रथम क्रमांक
१ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान.

२) ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३

द्वितीय क्रमांक
६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ,सन्मान.

महिला विभाग
३) ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ महिला विभाग, ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान.

तृतीय क्रमांक
३) ‘व्हाईस ऑफ मीडिया’ सकारात्मकता पुरस्कार
तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान.

नियमावली

दैनिक आणि साप्ताहिकामध्ये काम करणारे सर्व प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. ते पत्रकार त्या दैनिक/ साप्ताहिकाचे प्रतिनिधी आवश्यक आहेत.

ही स्पर्धा फक्त पत्रकार असणाऱ्या व्यक्तीसाठीच आहे.

जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक सकारात्मक बातम्या/ लेख लिहिणारे पत्रकार या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असतील.
सकारात्मक असणारे सामाजिक विषय, यशोगाथा, उद्योग आदी विषयांवरचे, थेट परिणामकारक असणाऱ्या बातम्या लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील.

ही स्पर्धा केवळ महाराष्ट्रापुरती आणि मराठी भाषेपुरतीच मर्यादित आहे.
मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, राजा माने, अनिल मस्के, विलास बडे सुधीरचेके पाटील, बालाजी मारगुडे ही तीन पिढींचे नेतृत्व करणारी संपादक, पत्रकार मंडळी निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
‘व्हाईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय एल.३०-१२०१- स्वप्नपूर्ती सेक्टर ३६ खारघर नवी मुंबई पिन कोड ४१०२१० या पत्त्यावर पोस्टाच्या, कुरियरच्या माध्यमातून महाराष्ट्रातले हे सगळे प्रस्ताव येतील.
‘व्हाईस ऑफ मीडिया’चे सर्व ठिकाणीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष,सचिव या प्रमुख चार जणांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. निवड प्रक्रियेमध्ये तीन प्रस्ताव, व एक महिलांकरिता असे एकूण चार प्रस्ताव या स्पर्धेमध्ये अंतिमतः मान्य होतील.

कार्यक्रमाचे स्वरूप:
जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठी भाषेचे मंत्री, माहिती विभागाचे मंत्री, संस्कृतिक मंत्री, माहिती व जनसंपर्क महासंचालक सचिव, महाराष्ट्राचे दोन ज्येष्ठ संपादक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमासाठी पुरस्कार विजेते तिघे जण आणि त्यांचे आई-वडील, पत्नीसह सर्व फॅमिली हे कार्यक्रमासाठी येतील. निमंत्रित केलेल्या दोन संपादकांपैकी एका संपादकाचे सकारात्मक पत्रकारितेवर व्याख्यान असेल किंवा सकारात्मक पत्रकारितेवर चार संपादकांचा परिसंवाद असेल. चारशे लोकांचा हा सोहळा पार पडेल.

Previous Workshop, contemplation camp

Leave Your Comment

Translate »