पत्रकाराने काळाप्रमाणे बदलले तर त्याची नोकरी शाबूत राहील, त्याने नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्या शिक्षणाच्या माध्यमातून पत्रकारितेचा आवाज अजून बुलंद केला पाहिजे. यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ प्रत्येक शाखेच्या ठिकाणी नवीन ट्रेनिंग सेशनचे आयोजन करत असते. येत्या काही दिवसांमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची स्किलिंग युनिव्हर्सिटी होऊ लागलेली आहे. पत्रकारितेमध्ये येणाऱ्या नवीन मुलांसाठी, पत्रकारितेमध्ये आता सध्या काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आणि जे पत्रकारितेतून सेवानिवृत्त झालेत अशा पत्रकारांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने वेगवेगळ्या स्वरूपातले ट्रेनिंग सेशनचे अनेक ठिकाणी आयोजन केलेले आहे आणि गरजेप्रमाणे करत असतात.
The latest Voice of Media news, articles, and resources, sent straight to your inbox every month.