पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुढाकार घेतला आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यासाठी स्वतंत्र सेलची स्थापना केलेली आहे. देशातल्या कुठल्याही दवाखान्यात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या अनुषंगाने लागणाऱ्या सोयीसुविधा याविषयी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सातत्याने पुढाकार घेते. हा सेल स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अडीच हजार पत्रकारांना मदत करण्याचे काम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’नने देशभरामध्ये केले आहे. भीमेश मुतुला या सेलचे प्रमुख आहेत. प्रत्येक राज्यामध्ये पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी काम करण्यासाठी भीमेश मुतुला यांची स्वतंत्र टीम देखील आहे.