ज्या पत्रकारांनी पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ते अद्यापही घर घेऊ शकले नाहीत. अशा पत्रकारांना ते ज्या शहरांमध्ये आहेत, तिथले प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि पत्रकार यांच्या माध्यमातून घर उपलब्ध करून द्यावे, हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. महाराष्ट्र त्यासाठी आयडॉल असणार आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 3600 घरे बांधण्याचा मनोदय आम्ही आखलेला आहे. त्याची सुरुवातही काही जिल्ह्यांपासून आता होऊ लागलेली आहे. महाराष्ट्राचे एक मॉडेल घेऊन आम्ही देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये घर नसलेल्या पत्रकारांसाठी घर देऊन त्यांच्या कुटुंबीयांना छप्पर देण्याच्या अनुषंगाने पुढाकार घेण्याचा मनोदय आखत पुढे जात आहोत.

Translate »