पत्रकारांच्या मुलांना शिक्षणासाठी आधार मिळावा यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने स्वतंत्रपणे शिक्षण समितीची स्थापना केली आहे. पत्रकारांच्या मुलांना योग्य त्या संस्थेत, योग्य त्या रुपयांत प्रवेश मिळावा यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कार्यरत आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य द्यावे, त्यांना परदेशी असणाऱ्या संधींची माहिती करून देत तिथे जाण्यासाठी मदत करायची यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकार घेते. मेडिकल, इंजिनियरिंगसाठी स्वतंत्र सेल स्थापन केले आहेत. शिक्षण समितीचे प्रमुख म्हणून चेतन कात्रे हे काम पाहतात, तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी डॉ. प्रमोद दस्तुरकर हे काम पाहतात. पत्रकारांच्या मुलांची अवस्था कशा स्वरूपाची आहे, त्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काय मदत लागते, या संदर्भातला सर्वे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने केला आहे.

Translate »