पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर पुढचे आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी पत्रकारांकडे पुंजी असणे आवश्यक आहे. यासाठी महामंडळासारखा विषय देशभरामध्ये लावून धरला तो ‘व्हॉईस ऑफ मीडियाने’! पत्रकारांचे शासनाच्या माध्यमातून मिळणारे सेवानिवृत्ती वेतन दुप्पट करावे, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने केली होती, त्यालाही यश आले. पत्रकारांसाठी उद्योग उभारणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकार घेणार आहे. पत्रकार कधीही सेवानिवृत्त होत नाही, पण जेव्हा त्याचा पगार बंद होतो, तेव्हा त्याला जगण्याचे, उदरनिर्वाहाचे साधन पैशांच्या रूपाने सतत सुरू राहावे यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकार घेत आहे. त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रोजेक्टचीही सुरुवात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ करणार आहे. पत्रकारांनी उद्योगाची कास धरावी, असा आग्रही ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चा आहे.